आरंभ मराठी / धाराशिव
पतीनेच पत्नीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन मेहुण्याकडून खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यासंबंधी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, आरोपी उत्तम ताय्याण्णा शिंदे (रा. विजयवाडी ता. माळशिरस ता. सोलापूर) याने दिनांक 23 जुलै रोजी 12 वाजता येडशी येथे त्यांच्या पत्नी फिर्यादी संगिता उत्तम शिंदे (वय 32 वर्षे, रा. दामाजी नगर धरमगाव रोड मंगळवेढा ता. मंगळवेढा जि. सोलापूर ह.मु. रामलिंग नगर वैद्य वस्ती येडशी) यांचा भाऊ सागर काळे याच्या मोबाईलवर संगीता यांचे काही खाजगी फोटो व गुगल पे स्कॅनर पाठवले.
तसेच त्याने धमकी दिली की, गुगल पे स्कॅनरवर पैसे पाठव नाहीतर तुझ्या बहिणीचे खाजगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन. फोटो व्हायरल न करण्याच्या बदल्यात आरोपीने सागर काळे यांच्याकडे खंडणीची मागणी केली.
आरोपी उत्तम शिंदे हा फिर्यादी संगीता शिंदे यांचा पती असून, तो सतत मारहाण करत असल्यामुळे संगीता या पतीला सोडून माहेरी भावाकडे स्थायिक झाल्या आहेत. याप्रकरणी संगिता शिंदे यांनी दिनांक 25 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 308(2), 115(2), 352, 351(4) सह 66 ई माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.