धाराशिव गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ४ आरोपी अटकेत
आरंभ मराठी/ धाराशिव
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील दिशा नागरी पतसंस्थेत ८ नोव्हेंबर रोजी झालेल्या लाखोंच्या चोरीचा तपास अवघ्या ४८ तासांत उघडकीस आणत धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने ४ आरोपींना जेरबंद केले. कर्जदारांच्या तारणातील ४.७६ किलो सोने व २,२१,००० रोख असा एकूण २ कोटी ६३ लाख ६३ हजार २७२ रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता.
तांत्रिक तपासानंतर पतसंस्थेतच लिपीक म्हणून काम करणारा राहुल राजेंद्र जाधव हा या चोरीचा मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याचे तीन साथीदारही उघडकीस आले.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व उपअधीक्षक निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुन्हे शाखेच्या पथकात पोनि इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, नंदकिशोर सोळंके, पोउपनि ईश्वर नांगरे, पोह दत्तात्रय राठोड, शौकत पठाण, जावेद काझी, फरहान पठाण, दयानंद गादेकर, बळीराम शिंदे, पोना अशोक ढगारे, योगेश कोळी, चापोह सुभाष चौरे, रत्नदिप डोंगरे, नागनाथ गुरव व प्रकाश बोईनवाड यांचा समावेश होता. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणानंतर जिल्ह्यातील सर्व सहकारी पतसंस्थांना सुरक्षा ऑडिट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पोनि विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा माग काढत पुण्यातील विविध ठिकाणांहून तीन आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. हे आरोपी दरोडा, जबरी चोरी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये यापूर्वीही सामील असल्याचे तपासात समोर आले. चौकशीत त्यांनी चोरी केलेल्या सोन्यापैकी काही दागिने शेतातील विहिरीत लपवून ठेवल्याचे कबूल केले. त्या ठिकाणी केलेल्या शोधात १ किलो ४९२ ग्रॅम ७०० मिली वजनाचे, १ कोटी ७५ हजार ७२५ किमतीचे दागिने जप्त करण्यात आले. सर्व चार आरोपी पोलीस कोठडीत असून अन्य साथीदार व उर्वरित मुद्देमालाबाबत तपास सुरू आहे.
यांना केली पोलिसांनी अटक
राहुल राजेंद्र जाधव,(रा. नळदुर्ग), सुशिल संजय राठोड(रा. नळदुर्ग), संजय अमृत जाधव,( रा. लाडवंतीवाडी, कर्नाटक), शिलरत्न महादेव गायकवाड (रा. औराद, ता. उमरगा),









