आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी सुरू असलेल्या मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात पाच प्रभागांचे निकाल जाहीर झाले आहेत. या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत असून प्रत्येक प्रभागात मतांचे समीकरण वेगवेगळे चित्र स्पष्ट करत आहे.
प्रभाग क्रमांक 1 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या उमेदवार कुरेशी परविन खलील यांनी 331 मते मिळवत स्पष्ट आघाडी घेतली आहे. शिवसेना (उबाठा) यांच्या गुरव संगीता सोमनाथ यांना 120, भाजपच्या नेहा राहुल काकडे यांना 113 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या सुरेखा नामदेव वाघमारे यांना 23, एमआयएमच्या मोमीन नाझिया युसुफ यांना 18 तर राष्ट्रवादीच्या मंजुषा विशाल साखरे यांना 7 मते मिळाली.
प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेना (उबाठा) आणि भाजप यांच्यात थेट लढत दिसून आली. शिवसेनेच्या गुरव संगीता सोमनाथ यांनी 170 मते मिळवली असून भाजपच्या नेहा राहुल काकडे यांना 169 मते मिळाली आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या कुरेशी परविन खलील यांना 100 मते मिळाली. इतर उमेदवारांना अत्यल्प मते मिळाली.
प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. भाजपच्या नेहा राहुल काकडे यांना 250 मते मिळाली असून शिवसेना (उबाठा) यांच्या गुरव संगीता सोमनाथ यांना 198 मते मिळाली. राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या कुरेशी परविन खलील यांना 90 मते मिळाली. इतर उमेदवारांना नगण्य प्रतिसाद मिळाला.
प्रभाग क्रमांक 5 मध्येही भाजपने वर्चस्व राखले आहे. भाजपच्या नेहा राहुल काकडे यांना 294 मते मिळाली असून शिवसेना (उबाठा) यांच्या गुरव संगीता सोमनाथ यांना 225 मते मिळाली. राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या कुरेशी परविन खलील यांना 52 मते मिळाली. उर्वरित उमेदवार पिछाडीवर राहिले.
प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजपची आघाडी अधिक भक्कम झाली आहे. भाजपच्या नेहा राहुल काकडे यांना तब्बल 377 मते मिळाली असून शिवसेना (उबाठा) यांच्या गुरव संगीता सोमनाथ यांना 163 मते मिळाली. राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या कुरेशी परविन खलील यांना केवळ 30 मते मिळाली.
पहिल्या पाच प्रभागांच्या मतमोजणीनंतर भाजपने काही प्रभागांमध्ये निर्णायक आघाडी घेतल्याचे चित्र आहे, तर काही ठिकाणी शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी आपली ताकद दाखवली आहे. उर्वरित प्रभागांच्या निकालांकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून अंतिम निकालातून धाराशिव नगरपालिकेतील सत्तेचे चित्र समोर येणार आहे.









