आरिफ शेख / धाराशिव
विठ्ठलाच्या भक्तीची अनेक रूपे आहेत, कुणी वारीला जाऊन तर कुणी घरीच राहून हरिनामाचा गजर करत विठ्ठलाजवळ आपलं गाऱ्हाणं मांडतात. धाराशिव शहरातील एका आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने भगवंत विठ्ठलाला रांगोळीतून साकारले आणि त्याच्यापुढं वारकऱ्यांचं गाऱ्हाणं मांडलं आहे.जय प्रवीण पंडीत असं या विद्यार्थ्यांचं नाव आहे.
जय प्रविण पंडित याने अत्यंत सुबक, आकर्षक, लक्षवेधी रांगोळी साकारली असून,त्यानं ही रांगोळी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर काढली आहे. त्यासाठी त्यानं तब्बल ८ तास मेहनत घेतली.त्यासाठी त्याने १२ किलो रांगोळीचा वापर केला. विठ्ठलाचं देखणं रूप आणि साकडं घालणारा वारकरी तसेच रांगोळीतून बाल वारकरीही तयार करण्यात आला आहे. असं चित्र या रांगोळीतून प्रतिबिंबित करण्यात आलं आहे. त्याच्या या कलाकृतीचं कौतुक केलं जात आहे.