आरंभ मराठी / कळंब
कळंब नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचंड चुरस पाहायला मिळत असून, महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांनी प्रत्येकी दहा जागांवर विजय मिळवत समसमान ताकद दाखवली आहे.
महायुतीकडून भाजपच्या ‘कमळ’ चिन्हावरून पाच तर शिवसेनेच्या ‘बाण’ चिन्हावरून पाच उमेदवार विजयी झाले आहेत.
दुसरीकडे महाविकास आघाडीकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या ‘मशाल’ चिन्हावरून नऊ तर काँग्रेसकडून एका उमेदवाराने विजय मिळवला आहे.
दरम्यान, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सौ. सुनंदा शिवाजी कापसे यांनी तब्बल २२५० मतांची भक्कम आघाडी घेतली असून केवळ औपचारिक विजयघोषणा बाकी असल्याचे चित्र आहे. कळंबच्या राजकारणात समसमान संख्याबळ आणि नगराध्यक्षपदावरील स्पष्ट आघाडीमुळे पुढील सत्तास्थापन प्रक्रियेबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.









