• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, September 15, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा; ५ ऑक्टोबरनंतरच सर्वेक्षण, प्रत्यक्ष मदतीसाठी नोव्हेंबर उजाडणार

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 15, 2026
in Drought
0
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा; ५ ऑक्टोबरनंतरच सर्वेक्षण, प्रत्यक्ष मदतीसाठी नोव्हेंबर उजाडणार
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिवसह राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची अपेक्षा होती. सोमवारी या जिल्ह्यांच्या नुकसानीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आला. त्यात सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यांमध्ये धाराशिवचाही समावेश आहे. त्यामुळे आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी ठोस आर्थिक मदत जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, दुष्काळाच्या प्रश्नावर सुमारे अर्धा तास चर्चा होऊनही शेतकऱ्यांना दिलासा देणारा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. पाणीटंचाईवर चर्चा करून उपाययोजनांबाबत सूचना करण्यात आल्या असल्या, तरी पिकांचे नुकसान, चारा टंचाई आणि आर्थिक मदतीबाबत निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. धाराशिव जिल्ह्यात सध्या खरीप पिके हातची गेली असून अनेक भागांत जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाने मोठी ओढ दिल्यामुळे सोयाबीनसह इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. जिल्हा प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना एकरी २० हजार रुपये मदत देण्याचा अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे. मात्र, या मागणीवरही मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. दुष्काळजन्य परिस्थितीत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अर्थात एनडीआरएफच्या माध्यमातून मदत देण्याची प्रक्रिया ५ ऑक्टोबरनंतरच सुरू करता येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. एनडीआरएफच्या निकषानुसार ५ ऑक्टोबरनंतर नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले जातील. त्यानंतर सर्वेक्षण पूर्ण करून नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठविला जाईल. केंद्राकडून मंजुरी आणि पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष मदत मिळण्यास नोव्हेंबर महिना उजाडण्याची शक्यता आहे.
महत्त्वाचे म्हणजे ५ ऑक्टोबरपूर्वी कोणत्याही परिस्थितीत राज्य सरकारला एनडीआरएफच्या निकषांनुसार दुष्काळ जाहीर करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापूर्वी शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यायची झाल्यास त्यासाठी राज्य सरकारलाच स्वतःच्या तिजोरीतून निधी उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. त्यामुळे आता राज्य सरकार शेतकऱ्यांच्या तातडीच्या मदतीसाठी स्वतंत्रपणे निधी देणार का, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. धाराशिव जिल्ह्यातील गंभीर परिस्थितीची दखल घेत जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना एकरी २० हजार रुपये मदत देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. मात्र, आजच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही. एकीकडे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांसमोर पुढील हंगामासाठी भांडवलाचा प्रश्न उभा राहिला आहे, तर दुसरीकडे जनावरांच्या चाऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अशा परिस्थितीत आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढण्याची शक्यता आहे.

SendShareTweet
Previous Post

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २० हजारांची मदत द्या; प्रशासनाची राज्य सरकारकडे शिफारस मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा; ५ ऑक्टोबरनंतरच सर्वेक्षण, प्रत्यक्ष मदतीसाठी नोव्हेंबर उजाडणार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा; ५ ऑक्टोबरनंतरच सर्वेक्षण, प्रत्यक्ष मदतीसाठी नोव्हेंबर उजाडणार

September 15, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २० हजारांची मदत द्या; प्रशासनाची राज्य सरकारकडे शिफारस   मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २० हजारांची मदत द्या; प्रशासनाची राज्य सरकारकडे शिफारस मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

September 15, 2026
बाप्पांच्या वाटेत खड्ड्यांचे विघ्न; धाराशिवचे बेफिकीर प्रशासन कोणत्या अपघाताची वाट पाहतंय ?  _  वर्षभर कामे सुरू; तरीही प्रमुख मार्ग अर्धवटच, नालीच्या खड्ड्यांचे मंडळांसमोर संकट

बाप्पांच्या वाटेत खड्ड्यांचे विघ्न; धाराशिवचे बेफिकीर प्रशासन कोणत्या अपघाताची वाट पाहतंय ? _ वर्षभर कामे सुरू; तरीही प्रमुख मार्ग अर्धवटच, नालीच्या खड्ड्यांचे मंडळांसमोर संकट

September 14, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group