• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, December 20, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

डीआयसी रोडवर स्पीड ब्रेकर ठरत आहेत अपघातांचे कारण; नियम धाब्यावर बसवून प्रवाशांची सुरक्षा धोक्यात

Aarambha Marathi by Aarambha Marathi
December 20, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
89
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव शहरातील राजमाता जिजाऊ चौक ते महात्मा बसवेश्वर चौकापर्यंत असलेल्या डीआयसी रोडवर अपघात टाळण्यासाठी बसवण्यात आलेले स्पीड ब्रेकरच अपघात वाढीचे कारण ठरत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. दिनांक 17 डिसेंबर रोजी रात्रीतूनच या चकचकीत व शहरातील एकमेव सुसज्ज रस्त्यावर सहा ते सात ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्यात आले.

मात्र, हे स्पीड ब्रेकर बसवताना कोणतीही पूर्वसूचना फलक, सावधगिरीची चिन्हे किंवा वाहनचालकांना सतर्क करणारे पांढरे-पिवळे पट्टे रस्त्यावर मारण्यात आले नाहीत. याच निष्काळजीपणाचा परिणाम म्हणून 18 डिसेंबर रोजी या डीआयसी रोडवर एकाच दिवशी पाच अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या. अपघात रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपायांमुळेच अपघात वाढल्याचा हा विचित्र आणि धक्कादायक प्रकार धाराशिव शहरात चर्चेचा विषय ठरला.

या गंभीर बाबीकडे ‘दैनिक आरंभ मराठी’ ने गुरुवार, दिनांक 18 डिसेंबर रोजी लक्ष वेधत बातमी प्रसिद्ध केली होती.

अपघात होऊ नये म्हणून बसवलेल्या स्पीड ब्रेकरमुळेच अपघात; डीआयसी रोडवर सकाळपासून पाच अपघात

बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने अर्धवट उपाययोजना करत माणिक चौक येथील एका स्पीड ब्रेकरजवळ फक्त पांढरे पट्टे मारले आहेत.

मात्र नियमानुसार स्पीड ब्रेकरवर स्पष्टपणे दिसणारे पांढरे व पिवळे पट्टे असणे आवश्यक असताना केवळ पांढरे पट्टे मारल्याने ते वाहनचालकांना विशेषतः रात्रीच्या वेळी स्पष्टपणे दिसत नाहीत. इतर ठिकाणच्या स्पीड ब्रेकरवर तर अद्याप एकही पट्टा मारलेला नसल्याने मागील दोन दिवसांत अपघातांचे प्रमाण अधिकच वाढल्याचे दिसून येत आहे.

वाहतूक नियमांनुसार स्पीड ब्रेकरच्या ठिकाणी थर्मोप्लास्टिक पट्टे, रिफ्लेक्टीव्ह पट्टे किंवा स्पष्ट पांढरे-पिवळे पट्टे देणे बंधनकारक आहे. तसेच स्पीड ब्रेकर येण्याआधी किमान 40 मीटर अंतरावर वाहनचालकांना सतर्क करणारे पट्टे किंवा सूचना असणे आवश्यक असते. प्रत्यक्षात या रस्त्यावर यातील एकही नियम पाळला गेलेला दिसून येत नाही.

रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी स्पीड ब्रेकरवर रिफ्लेक्टर बसवणे आवश्यक असताना तेही बसवण्यात आलेले नाहीत. स्पीड ब्रेकरची कोणतीही ठोस सूचना नसल्यामुळे एखादा गंभीर अपघात घडून त्यामध्ये कोणाला जीव गमवावा लागल्यास त्याची जबाबदारी कोणाची? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

अपघात टाळण्याच्या नावाखाली नियमांकडे दुर्लक्ष करून प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यात आल्याचा गंभीर आरोप होत आहे. प्रशासनाने तातडीने सर्व स्पीड ब्रेकरवर नियमानुसार स्पष्ट सूचना, पांढरे-पिवळे रिफ्लेक्टीव्ह पट्टे व रिफ्लेक्टर बसवावेत, अन्यथा या रस्त्यावर अपघातांची मालिका थांबणे कठीण होणार आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#osmanabad#Speedbreakers#accidents#roads#rules#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

नगराध्यक्ष पदाच्या निकालासाठी होणार उशीर; ‘अशी’ होणार उद्या मतमोजणी

Next Post

धाराशिवमध्ये मतदानाला थंडा प्रतिसाद; दीड वाजेपर्यंत ‘इतके’ मतदान

Related Posts

धाराशिवमध्ये मतदानाला थंडा प्रतिसाद; दीड वाजेपर्यंत ‘इतके’ मतदान

December 20, 2025

नगराध्यक्ष पदाच्या निकालासाठी होणार उशीर; ‘अशी’ होणार उद्या मतमोजणी

December 20, 2025

बोगस डॉक्टरची तोतयेगिरी उघड; चुकीच्या उपचारांमुळे रुग्णाच्या जीवितास धोका, डॉक्टरवर गुन्हा दाखल

December 18, 2025

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून पीडितेच्या भावाला बेदम मारहाण

December 18, 2025

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील पाच ठिकाणचे आठवडी बाजार 21 डिसेंबर रोजी बंद ठेवण्याचे आदेश

December 18, 2025

धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शालेय विद्यार्थ्यांच्या टॅम्पोचा भीषण अपघात; ३५ विद्यार्थी जखमी

December 18, 2025
Next Post

धाराशिवमध्ये मतदानाला थंडा प्रतिसाद; दीड वाजेपर्यंत 'इतके' मतदान

ताज्या घडामोडी

धाराशिवमध्ये मतदानाला थंडा प्रतिसाद; दीड वाजेपर्यंत ‘इतके’ मतदान

December 20, 2025

डीआयसी रोडवर स्पीड ब्रेकर ठरत आहेत अपघातांचे कारण; नियम धाब्यावर बसवून प्रवाशांची सुरक्षा धोक्यात

December 20, 2025

नगराध्यक्ष पदाच्या निकालासाठी होणार उशीर; ‘अशी’ होणार उद्या मतमोजणी

December 20, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group