पालिकेच्या इतिहासातला प्रशासनाच्या सर्वाधिक काळ्या कुट्ट अंधाराचा कारभार बुधवारी संपणार
आरंभ मराठी / धाराशिव
2021 मध्ये नगर पालिकेवरील लोकनियुक्त कार्यकारी मंडळाचा कार्यकाळ संपल्यापासून पालिकेवर प्रशासनाचे राज्य सुरू आहे. या काळात धाराशिव पालिकेची ऐतिहासिक काळी कारकिर्द धाराशिवच्या जनतेने अनुभवली. प्रचंड भ्रष्ट कारभार, कामांची वाताहत आणि जनतेचे प्रचंड हाल..अशा परिस्थितीत नगर पालिकेची निवडणूक होत आहे. पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे राज्य 3 तारखेला संपुष्टात येईल आणि शहरातला काळा कुट्ट अंधार संपेल,अशी अपेक्षा आहे.दरम्यान, शिवसेना उबाठा गटाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी शनिवारी सायंकाळी शहरातून अंधाराला भेदण्यासाठी मशाल पेटवली आणि पालिकेवर मशालीची सत्ता येण्यासाठी नागरिकांना साकडे घातले.
धाराशिव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस (आय) आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक ५ आणि ६ मधील मशाल रॅलीत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्यासह उपस्थित राहून जिजाऊ चौकातील सभेस संबोधित केले..
शिवसेना पक्षप्रमुख तत्कालील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात बार्शी नाका ते बोंबले हनुमान रस्त्यासाठी आपण ३.७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.. परंतु या रस्त्याच्या कामाबाबत आत्ताच्या सत्ताधारी स्थगिती आमदारांनी विधीमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित करून कार्यादेश झालेला रस्ता स्थगित केला..
विकास कामात अडथळा आणून कामे स्थगित करणाऱ्यांना हद्दपार करण्याची संधी आता धाराशिवकरांना आलेली असून मतदार मतदानातून त्त्यांना यांची जागा निश्चित दाखवतील असा विश्वास आहे.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस (आय) आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार गुरव संगीता सोमनाथ तसेच नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना मशाल व हाताचा पंजा समोरील बटण दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
धाराशिव पालिकेतील अधिकारी वर्गाची भ्रष्ट कारभाराची मालिका थांबावी आणि पुन्हा जनतेचे राज्य सुरू व्हावे अशी नागरिकांची अपेक्षा आहे.









