आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस पार पडला असून, मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी तब्बल ७ अपक्ष उमेदवारांनी अखेरच्या दिवशी अर्ज मागे घेतले. पवार कल्पना भारत, मुंडे अश्विनी चंद्रकांत, राऊत राधिका धनंजय, हन्नुरे हिना हाजी, पठाण हजरबी मैनुद्दीन, नळे वर्षा युवराज आणि यादव ज्योती अजयकुमार यांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून आता नगराध्यक्ष पदासाठी ६ उमेदवार रिंगणात उरले आहेत.
नगरसेवक पदासाठीही माघारीची मोठी लाट पाहायला मिळाली. एकूण ५५ उमेदवारांनी अखेरच्या दिवशी आपले अर्ज मागे घेतले असून, आता २०१ उमेदवार रिंगणात आहेत. माघार घेणाऱ्या उमेदवारांमध्ये लोखंडे अनुराधा सचिन, पठाण यास्मिन खलील, निंबाळकर राजश्री विनोद, शेख शबाना वाजिद, प्रमोद प्रकाश सोनवणे, साळुंखे अक्षय प्रकाश, तडवळकर ऋषिकेश मधुकर, पठाण आसिफ खान चांदखान, नागरगोजे चंदन शिवाजी, उंबरे सायली अश्विन, निंबाळकर प्रमोद अशोकराव, मंजुषा विशाल साखरे, मोमीन आवेद इद्रीसमिया, माकुडे राहुल रामकृष्ण, बागल नितीन केशवराव, बागल अतुल शामराव, काकडे दिनेश भानुदासराव, सुरवसे राहुल रामलिंग, कोकाटे संदीप दिलीप, माळी अमोल सुभाष, शेख सालेहाकौसर मोहसीन, जाधव श्रद्धा जीवन, शेख सुमया इरफान, भोसले वैभव बाळासाहेब, सलगर संदीप गोरोबा, अंभोरे सतीश गंगाधर, खळतकर योगेश लिंबराज, निशा अनिल मुंडे, पाटील प्रणिता पंकज, पाटील मंजुश्री अण्णासाहेब, बनसोडे शीला मुकुंद, शेख जबी मोहम्मद हुसेन, बनसोडे सूर्यानंद विद्यानंद, गायकवाड कृष्णा यशवंत, शिंगाडे विशाल गंगाधर, मोरे शंकर विठ्ठल, पेठे राजश्री मिलिंद, जाधव शशिकला प्रकाश, पेठे महादेव रानबा, कुरेशी फैजान जलील, निंबाळकर सह्याद्री संताजी, शेख लईक अहमद मोहम्मद शबीर अहमद, सय्यद असलम इस्माईल, शेख तोफिक रफिक, सय्यद फरहीन शहनवाज, शेख रसिका बेगमबाबा, मुजावर शहबाज निजामुद्दीन, पठाण अजहरखान जाकीरखान, कुरेशी इकबाल उस्मान, शेरकर सागर विश्वनाथ, पठाण अंजुम वाजिद, तुपे निकिता शाम, शेख बीबी हजरा अमीर आणि साळुंखे पूजा निलेश यांचा समावेश आहे. अर्ज माघारीनंतर नगराध्यक्ष पदाची लढत सरळ होत असून ६ उमेदवारांत मुकाबला होणार आहे. यामधे काकडे नेहा राहुल, पुरेशी परविन खलील, गुरव संगीता सोमनाथ, मंजुषा विशाल साखरे, मोमीन नाझिया इसुफ, वाघमारे सुरेखा नामदेव यांच्यात लढत होणार आहे.
तर नगरसेवक पदासाठी २०१ उमेदवारांमुळे अनेक प्रभागांत तिरंगी आणि चौरंगी लढती रंगणार आहेत. माघारीमुळे काही प्रभागांतील राजकीय गणिते बदलली असून प्रचाराची हवा आता अधिक जोर धरताना दिसत आहे.








