आरंभ मराठी / तेर
तीन वर्षांच्या उत्सुकता लागलेल्या पंचायत समिती निवडणुकीचे दाराशी तालुक्यातील 24 पंचायत समिती जाण्याच्या आरक्षण सोमवारी करण्यात आली असून त्यामध्ये सभापती पदासाठी आवश्यक असणारे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला हे गण बेंबळी,येडशी, समुद्रवाणी हे गण आरक्षित झाले असल्याने हे गण सभापती ठरवणार आहेत.
इतर आरक्षणामध्ये गोवर्धनवाडी,चिलवडी अनुसूचित जाती ,तर शिगोली,सांजा, हे गण अनुसूचित जाती महिला साठी आरक्षित झाले आहेत तर
पळसप हा गण अनुसूचित जमाती महिला साठी आरक्षित झाले आहे
ओं.बी.सी साठी.चिखली, अंबेजवळगा,तडवळा,तर ओ.बी.सी.महिला साठी बेंबळी,येडशी, समुद्रवाणी आरक्षित झाले आहेत
तर सर्वसाधारण गणात वडगाव, वाघोली,पाडोळी, करजखेडा,जागजी ,कोंड,ढोकी हे गण आहेत तर सर्वसाधारण महिला साठी रूईभर,आळणी,तेर, इर्ला केशेगाव,उपळा हे गण आरक्षीत झाले आहेत
तीन वर्षांनंतर आरक्षण निघाल्यानंतर आता प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत