आरंभ मराठी / धाराशिव
मागील आठवड्यात बारावीचा निकाल लागल्यानंतर सर्वांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले होते. या निकालाची पालक आणि विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते.
जवळपास सर्वच बोर्डाचे निकाल जाहिर करण्यात आले होते. मात्र, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल अजून जाहीर करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालासंबंधी मोठी घोषणा केली आहे.
उद्या मंगळवारी (दि.१३) दुपारी एक वाजता दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. उद्या दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना बोर्डाच्या आणि अन्य संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येणार आहे.
त्यानंतर आपापल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे. दहावीच्या परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांनी निकालाच्या लॉगिन विंडोमध्ये आवश्यक लॉगिन तपशील भरणे आवश्यक आहे.
एकदा निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी त्यांच्या मार्कशीट्स अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in द्वारे पाहू शकतात तसेच डाउनलोड करू शकतात.