आरंभ मराठी / धाराशिव
दोन महिलांवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाराशिव तालुक्यातील एका गावातील दोन महिला मंगळवारी (दि.८) दीड वाजता त्यांच्या झोपडीत झोपल्या होत्या. त्यावेळी तीन तरुणांनी त्या दोन महिलांना बाजूच्या शेतात ओडत नेवून मारहाण करुन त्यांच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच आरोपींनी त्यांच्या झोपडीला आग लावून झोपडी पेटवून दिली.
पिडीत महिलांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-70(1), 326 (ग),115(2), 3(5) सह कलम 3(1) (W) (i)(ii), 3(2)(v) अ.जा.ज.अ.प्र. कायदा अन्वये तीन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बेंबळी पोलीस अधिक तपास करत आहेत.