प्रतिनिधी / धाराशिव
जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. धाराशिव शहरात तसेच वाशी आणि भूम येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. धाराशिव शहरात 350 पदांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला असून 20 कंपन्या व आस्थापना सहभागी होत आहेत तर वाशी आणि भूम येथे 50 हून अधिक कंपन्या मेळाव्यात येणार आहेत. जिल्ह्यातील शेकडो तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी यानिमित्ताने निर्माण झाल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली व भूम परंडा वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भूम, परंडा व वाशी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली, यावेळी वाशी तसेच भूम येथे 24 डिसेंबर 2023 रोजी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या संकल्पनेतील भव्य रोजगार मेळाव्याबाबत भूम, परंडा व वाशी तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांसोबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये या मेळाव्यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष धुरगुडे म्हणाले की सुरेश बिराजदार यांच्या संकल्पनेतून भूम, परंडा, वाशी येथील युवक युवतींसाठी भव्य रोजगार मेळावा 24 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला असून, या मेळाव्यामध्ये 50 हून अधिक नामांकित कंपन्या रोजगार घेऊन आपल्या तालुक्यामध्ये येणार आहेत.यामुळे हजारो युवक व युवतींना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. त्यामुळे युवक व युवतींना या मेळाव्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले.
यावेळी भूम तालुकाध्यक्ष ॲड.रामराजे साळुंके, वाशी तालुकाध्यक्ष ॲड.सूर्यकांत सांडसे, परंडा तालुकाध्यक्ष अमोल काळे,परंडा शहराध्यक्ष जावेद पठाण, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, महेश नलावडे, भूम युवक तालुकाध्यक्ष दादासाहेब निरफळ, वाशी युवक तालुकाध्यक्ष बाळासाहेब काटवटे, भूम युवक तालुकाध्यक्ष दादासाहेब निरफळ, भूम तालुका युवक कार्याध्यक्ष संदीप गटकळ,उपाध्यक्ष ॲड.मुंडे, परंडा अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष जहांगीर शेख,नगरसेवक भगवतराव कवडे,शिवशंकर चौधरी,नगर सेवक विकास पवार,बापूराव जगदाळे,जालिंदर जगदाळे, अंगद जगदाळे, गणेश माने,जितेंद्र निरफळ, संदिप गटकळ,नीरज सपकळ, तानाजी नाईकवाडी, सरिफ मुजावर, रिहाल शेख, असलम मुजावर,बच्चन तांबे,अब्दुल पठाण,संदीप खरवडे आदी पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.
धाराशिव शहरात मेळावा
धाराशिव – शासनाच्या रोजगार व स्वंयरोजगार धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सुशिक्षीत बेरोजगार / नोकरी इच्छुक उमेदवारांना नोकरी उपलब्ध करून देण्याच्या उदेशाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत “पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावे” आयोजित करण्यात येत आहेत. या कार्यक्रमाचा भाग म्हणून जिल्ह्यातील आस्थापना / उद्योग यांना आवाहन करून जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सहभागी करून घेतले आहे. तसेच पुणे, बारामती, छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित कंपन्याही या मेळाव्यात सहभागी होणार आहेत.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धाराशिव आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान (उमेद) यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, 22 डिसेंबर 2023 रोजी जिल्ह्यातील महिलांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यात खाजगी क्षेत्रातील नामांकित 20 उद्योजक व आस्थापनांनी सहभाग घेतलेला आहे. या माध्यमातून 350 पदे अधिसुचित केलेली आहेत. पात्र व इच्छुक महिला उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवड प्रकिया करणार आहेत. तसेच या रोजगार मेळाव्यात रोजगारांच्या संधी व कौशल्य विकास प्रशिक्षणाबद्दल मार्गदर्शन होणार आहे.
या मेळाव्यात दहावी पास/नापास, बारावी, आयटीआय, ग्रज्युऐट, पोस्ट ग्रज्युऐट, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, डी.एड, बी.एड, नर्सीग, टेलरिंग यांना या CMRC मॅनेजर, एमबीए एचआर, इजिंनिअर, अकाउंटंट, सहयोगिनी, ट्रेनी, ऑफिस असोशिएट, हाऊस किपींग, रूरल करिअर एटंट, डेव्हलपमेंट मॅनेजर, नारी शक्ती, लाइफ मित्रा, टेली कॉलर, शिक्षक, सेल्स अॅडव्हायझर, क्लार्क, अॅडमिन असिस्टंट, नर्स, हॉस्पिटल वर्कर मावशी, वॉर्ड गर्ल, हेल्पर, आयटीआय सर्व ट्रेड अशा प्रकारचे अनेक संधी रोजगार मेळाव्यातून उपलब्ध होणार आहेत.
या मेळाव्यामध्ये जिल्ह्याबाहेरील पियाजिओ व्हेईकल्स बारामती, यशस्वी अॅकडमी पुणे, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन छत्रपती संभाजीनगर व धाराशिव जिल्ह्यातील LIC OF INDIA, SBI Life Insurance, बन्सल क्लासेस, इंडोमोबाईल सेल्स ॲण्ड सर्व्हिसेस, शितीज बिल्डकॉन, प्रभाकर बोंदर महाविद्यालय, श्री सिध्दीविनायक मल्टिीस्टेट, S.K. गारमेंट, घोलप फॅशन हब, कठारेजी कलेक्शन, सह्याद्री हॉस्पिटल, के. के हॉस्पिटल, परवीन हॉस्पिटल, मोरया हॉस्पिटल, सुविधा हॉस्पिटल व वात्सल्य हॉस्पिटल या 20 कंपन्या / आस्थापना मेळाव्यात सहभागी होणार आहेत. मेळाव्यासाठी जिल्ह्यातील नोकरी इच्छुक व पात्र महिला उमेदवार/पालक/नागरिकांनी शुक्रवार, 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सेंट्रल बिल्डींग परिसर या ठिकाणी उपस्थित राहून रोजगार मेळाव्यातील रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाच्या 02472-299434 दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.












