महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे निवेदन
प्रतिनिधी / धाराशिव
1 एप्रिल 2023 पासून लागू होणारा नवीन पगारवाढीचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने महावितरणचे संचालक अरविंद भादीकर,
महापारेषणचे संचालक सुगत गमरे,महानिर्मितीचे कार्यकारी संचालक सावळकर व तिन्ही वीज कंपन्यांचे मुख्य औद्योगिक संबंधित अधिकारी, महावितरणचे ललित गायकवाड,महापारेषणचे भरत पाटील,महानिर्मितीचे वारजुरकर यांना सादर करण्यात आला.यात तीस टक्के पगार वाढ मागणी,भत्ते शंभर टक्के वाढ आणि वार्षिक वेतन वाढ 3.19% अशी मागणी केली आहे.त्याचबरोबर कराराचा कालावधी एप्रिल 2023 ते मार्च 2028 असा आहे.तसेच संघटनेची प्रस्तावामागील भुमिका समजावून सांगण्यात आली.
या प्रसंगी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डाॅ.संजय घोडके,संघटनेचे कायदेविषयक सल्लागार नरेंन्द्र जारोंडे,संघटनेचे कार्याध्यक्ष संजय मोरे,प्रमुख संघटक सुर्यकांत जनबंधू,उपसरचिटणीस किशोर अहीवळे, राज्य उपाध्यक्ष गणेश मुरकुटे,ईश्वर भारती, शशिकांत पवार हे उपस्थित होते.अशी माहिती संघटनचे धाराशिव अध्यक्ष बापू जगदे,सिद्दिक मुलाणी,बालाजी आगवणे,विठ्ठल गायके,गौतम मोटे,दिलीप घाटेराव,सुदाम ओव्हाळ,निशिकांत संगवे,कल्याण गंगावने,सचिन शिंदे, यांनी दिली आहे.