प्रतिनिधी / धाराशिव
पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची पहिलीच बैठक सोमवारी सकाळी पक्षाच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान, या बैठकीला काही प्रमुख नेते, पदाधिकारी अनुपस्थित होते तर पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी राजीनामा दिल्यामुळे आता संजय पाटील दुधगावकर यांचे नाव चर्चेत आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची बैठक झाली. प्रस्ताविक करताना दुधगावकरांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते, शेतकरी,शेतमजूर, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, कामगार शंभर टक्के शरद पवार यांच्या पाठीमागे आहेत, हे हात वरती करून सांगावे,असे आवाहन केले. यावेळी सर्वांनी हात वर करून अनुमोदन दिले. जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार राहुल मोटे यांनी हा जिल्हा एकसंघ शरद पवार यांच्या पाठीमागे राहणार, अशी ग्वाही दिली. जिल्ह्यातील प्रमुख नेते,पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष यांनी सर्व फ्रंटल जिल्हाध्यक्ष,सर्व शहराध्यक्ष यांनी अनुमोदन दिले.पक्षाचे जिल्हाध्यक्ष बिराजदार यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर त्यांच्या जागी जिल्हाध्यक्ष कोण,याबद्दल कार्यकर्त्यांना उत्सुकता असून, दुधगावकर यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बैठकीसाठी जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर,माजी आमदार राहुल मोटे, प्रदेश सचिव मसूद शेख,जिल्ह्याचे नेते संजय निंबाळकर, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर, ज्येष्ठ नेते संपतराव डोके,डॉ. प्रतापसिंह पाटील,महेंद्र धूरगुडे, अमित शिंदे, जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन मधुकरराव मोटे, प्रा. संजय कांबळे, नितीन बागल,वाजिद पठाण, कादर खान,सतीश एखंडे,हबीब खान पठाण,अनिलदादा शिंदे, मझहर शेरेकर,रोहित बागल,नितीन बिक्कड, तालुकाध्यक्ष संजय पवार,श्याम घोगरे, श्रीधर भवर, हनुमंत पाटोळे,धैर्यशील पाटील, दिलीप घोलप, रंजना भोजने, शहराध्यक्ष अयाज शेख,मुसद्दीक काझी,रमेश मस्कर, महबूब शेख,प्रमोद वीर, नाना जमदाडे,जयंत देशमुख दशरथ माने, बलभीम गरड, नितीन चव्हाण, दौलत गाढवे,जिल्हाध्यक्ष शेखर घोडके,मनीषा पाटील,राहुल बनसोडे,अविनाश तांबारे, विशाल शिंगाडे,प्रदीप डोके,असदखान पठाण,अमोल पाटील,सतीश घोडेराव,अशोक नलावडे,महेश नलावडे, मनोज मुदगल,अमरसिंह देशमुख,रमेश देशमुख आदींसह आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.