विकास हाच केंद्रबिंदू असेल, कळंब शहरात भव्य दुचाकी रॅली
प्रतिनिधी / कळंब
कळंब शहरात आज राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत दुचाकी रॅली काढण्यात आली.त्यानंतर कळंब शहरात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी बोलताना विकास हाच केंद्रबिंदू असेल,असा निर्धार पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केला. तर यावेळी त्यांनी राईट टू हेल्थ कायदा Right to Health Act करणार असल्याची घोषणा केली. तसेच धाराशिव-कळंब मतदारसंघात नवीन आणि सर्वसामान्य कुटुंबातील नेतृत्व निर्माण होईल, असे संकेत त्यांनी दिले.
कळंब शहरात वृक्ष लागवडीच्या ऐतिहासिक कामामुळे DYSP एम.रमेश (IPS) व विलास पाटील,ह.भ.प.महादेव महाराज अडसूळ,प्रकाश भडंगे यांचा पालकमंत्री सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्याकडे मन्मथ स्वामी मंदिरास तीर्थक्षेत्र दर्जा व निधी संदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी राजेंद्र (आबा ) मुंडे ,सागर मुंडे,निलेश होनराव समस्त लिंगायत समाज बांधव उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेशही झाला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळूंके, माजी उपनगराध्यक्ष संजय मुंदडा,लक्ष्मीकांत हुलजुते,पिंटू लंगडे,मुंडे आबा,सागर मुंडे ,मंदार मुळीक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.