प्रतिनिधी | धाराशिव
जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा या करता ग्रंथपाल कुंभार यांनी शिक्षण अधिकारी सुसर यांच्या दालनात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहणाचा प्रयत्न केला.उपस्थित अधिकारी वं कर्मचारी यांच्या उपस्थितीमुळे कुंभार यांचा आत्मदहणाचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.कुंभार यांना आनंदनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा या करता प्रशासकीय पातळीवर मदत मिळवी म्हणून शिक्षण अधिकाऱ्यांना अडीच लाख रुपये दिले गेले. सेवानिवृत्त दोन दिवसांवर येऊन ठेपाली तरी शिक्षण अधिकऱ्यांनी पैश्याच्या मोबदल्यात आपले काम न केल्याच्या संतापाने ग्रंथपाल चांगललेच खवळले. शिक्षण अधिकारी सुसर यांच्या कार्यालयात ग्रंथपाल कुंभार यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.
भूम येथील ग्रंथपाल बाळू कुंभार हेच रवींद्र हायस्कूल या खाजगी शाळेचे अर्धवेळ ग्रंथपाल म्हणून 1994 पासून काम करतात 2006 पासून शासन निर्णयानुसार पूर्णवेळ ग्रंथपाल म्हणून ते कार्यरत आहेत. 1994 ते 2006 याकालावधीतली सेवा ही अर्धवेळ पेन्शन योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरली जावी असा औरंगाबाद खंडपिठाने निर्णय दिला आहे. याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांनी 30 मार्च पर्यंत निर्णय घेण्याचा आदेश दिला होता. मात्र शिक्षण अधिकारी सुसर यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करत कोणतीही कार्यवाही केली नाही. ग्रंथपाल कुंभार यांनी गजानन सुसर यांच्याकडे काम होण्यासाठी पाठपुरावा केला. 50 हजार रुपये दिले. पैसे देऊनही काम होत नसल्याने कुंभार यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. मंगळवार,27 जून 11.45 च्या सुमारास माध्यमिक शिक्षण अधिकारी गजानन सुसर यांच्या दालनात कुंभार यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
दरम्यान उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांच्या सतर्कतेमुळे कुंभार यांचा आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. आणि कुंभार यांना आनंदनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.