• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, May 19, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Chandrashekhar Bavankule घेणार तयारीचा आढावा, धाराशिव लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा, शिंदे गटाचे काय होणार..?

Aarambha Marathi by Aarambha Marathi
December 4, 2023
in राजकारण
0
0
SHARES
281
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / धाराशिव

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यात धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सर्वच सहा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्याचे स्पष्ट होत आहे. महायुतीच्या सूत्रानुसार धाराशिव लोकसभेची जागा शिवसेनेकडे आहे. अर्थात शिंदे गट या जागेवर दावा करू शकतो. मात्र भाजपने स्वबळावर तयारी सुरू केल्याने शिंदे गटाचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

काही राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय मिळाल्यानंतर भाजपचे बळ वाढले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातही जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपसोबत राज्याच्या सत्तेत शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवारांचा गट असला तरी भाजपने अनेक ठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्धार केल्याचे दिसून येत आहे. किंबहुना राज्यातील सर्वच 48 जागा भाजप लढणार असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळेच प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील तयारीचा आढावा घेतला जात आहे. त्यासाठीच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.त्यांच्या धाराशिव जिल्हा दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष संताजीराजे चालुक्य यांनी दिली. चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांचा जंगी सत्कार करण्यात येणार असल्याचेही श्री चालुक्य यांनी सांगितले.

भाजपा जिल्हाध्यक्ष श्री चालुक्य म्हणाले, प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे धाराशिव लोकसभा मतदार संघ व सहा विधानसभा मतदारसंघातील पक्ष संघटन अधिक बळकट करण्याच्या मोहिमेच्या अनुषंगाने येत आहेत. लोकसभा कोअर कमिटी बैठकीस बावनकुळे मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर दुपारी सुपर वॉरिअर्स यांच्याशी बावनकुळे संवाद साधणार आहेत. मंडळ, बूथ प्रमुख नियुक्तीचा आढावा घेणार आहेत. बावनकुळे यांच्या या महत्वपूर्ण दौऱ्याच्या पार्श्वभूमिवर धाराशिव लोकसभा मतदारसंघात तयारी करण्यात आली आहे. लोकसभा मतदारसंघातील धाराशिव, तुळजापूर, परंडा,उमरगा (जिल्हा धाराशिव), औसा ( जिल्हा लातूर)व बार्शी (सोलापूर ) या ६ विधानसभा मतदारसंघ निहाय पक्षाचे पदाधिकारी व वॉरिअर्स यांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. या पूर्वतयारी बैठकीस आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. अभिमन्यू पवार, आ. राजेंद्र राऊत, माजी आ. सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष संताजीराजे चालुक्य – पाटील आदींनी मार्गदर्शन केले.

यशाबददल बावनकुळे यांचा सत्कार होणार

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या ३ प्रमुख राज्यातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन केले. भाजपाने ३ प्रमुख राज्यात सत्ता संपादन केल्याबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा धाराशिव जिल्हा भाजपाच्या वतीने जंगी सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष श्री चालुक्य पाटील यांनी दिली.

SendShareTweet
Previous Post

Uddhavrao patil भाई उद्धवराव दादांची तिसरी पिढी शरद पवारांसोबत; नातू आदित्य पाटलांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, पवारांनी सोपवली युवकच्या प्रदेश सचिवपदाची जबाबदारी

Next Post

Kalbhairav festival श्री.काळभैरवनाथ जन्माष्टमीनिमित्त कंडारी- सोनारीमध्ये भरगच्च कार्यक्रम: अखंड हरिनाम सप्ताहाची बुधवारी सांगता

Related Posts

धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनवर आ.राणा पाटलांचेच वर्चस्व

April 6, 2025

कसला आलाय राजकीय भूकंप..? ठाकरेंच्या शिलेदाराने जाहीर केली भूमिका, म्हणाले..

January 27, 2025

धीरज पाटलांच्या निष्ठावंत मेळाव्याकडे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची पाठ, मधुकर चव्हाणांचा गट ठरतोय वरचढ

September 30, 2024

Kailas Patil पाच वर्ष निष्क्रीय, आता निवडणुकीच्या तोंडावर शहराच्या समस्येचा कैलास पाटलांना कळवळा

September 29, 2024

लोकसभेपूर्वीच आखाडा पेटला; आमदार राणा पाटील यांच्या टीकेनंतर खासदार ओमराजेंचाही राणांवर टीकेचा बाण

January 20, 2024

ठाकरे गटाच्या शिवसेनेची गुरूवारी संघटन कार्यशाळा; पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

January 16, 2024
Next Post

Kalbhairav festival श्री.काळभैरवनाथ जन्माष्टमीनिमित्त कंडारी- सोनारीमध्ये भरगच्च कार्यक्रम: अखंड हरिनाम सप्ताहाची बुधवारी सांगता

Dr.Tanaji savant सावंतांनी शब्द पाळला, तेरणा कारखाना ठरला उसाला आजवरचा सर्वाधिक दर देणारा कारखाना; पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर झाला वर्ग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तुळजापुरमध्ये ड्रग्ज नंतर मटक्याचा सुळसुळाट

May 18, 2025

धाराशिव जिल्ह्यात वृत्तपत्र विक्रेत्यांचा बंद जिल्ह्यातील वृत्तपत्र वितरण ठप्प.

May 18, 2025

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आणखी एक आरोपी ताब्यात; सेवन गटातील आबासाहेब पवार अटकेत

May 18, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group