पोलिसांच्या धाडीत शहरातील
33 बडे मासे गळाला
आरंभ मराठी / तुळजापूर
तुळजापूर शहरात ड्रग्ज नंतर मटका आणि जुगाराचा सुळसुळाट झाला असून, पोलिसांनी टाकलेल्या धाडीत शहरातील 33 बडे मासे गळाला लागले आहेत.
यासंबधी सविस्तर वृत्त असे की,धाराशिव रोडवर असलेल्या मलबा हाईट्स मधील एका फ्लॅटवर अवैधपणे मटका सुरू असल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी धाड टाकली असता, तेथे अवैधरीत्या मटका घेत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी एकूण 33 जणांवर गुन्हा दाखल केला असून, तुळजापूर शहरातील काही राजकीय नेत्यांची नावे यात समोर आली आहेत.
यावेळी घटनास्थळावरून 1 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तुळजापूर शहरातील धाराशीव रोडवरील मलबा हाईट्सच्या पहिल्या मजल्यावरील साठे यांच्या फ्लॅटमध्ये काही जण कल्याण मटका, मिलन मटका खेळत व खेळवत आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिसांनी शनिवारी रात्री दहाच्या सुमारास त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी आतमध्ये चार व्यक्ती आढळून आल्या. त्यामध्ये विक्रम दिलीप नाईकवाडी (वय 31 वर्ष, रा. तुळजापूर), विकास बाबुराव दिवटे (वय-30, रा. तुळजापूर), रवींद्र बळीराम ढवळे (वय-28, रा. तुळजापूर), निलेश आप्पासाहेब तेलंग (वय-29) हे आढळून आले.
पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ मोबाईल फोन, लॅपटॉप, प्रिंटर हे साहित्य आढळून आले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, यामध्ये आणखी 29 जणांची नावे निष्पन्न झाली आहेत.
यामध्ये चैतन्य शिंदे, अमोल कुतवळ, सचिन पाटील, विनोद गंगणे, राम मांगडे, विजय निंबाळकर, ज्ञानेश्वर जाधव, संतोष जगताप, मोहन मोहरकर, कृष्णा काळे, मिथुन पोकळे, अजाज शेख, राम मस्के, हसन नाईकवाडी, संतोष रोकडे, कुलदीप गरड, अक्षय खराडे, गाढवे सर, विकी पोकळे, सुभाष पारवे, सागर शिंदे, शुभम क्षीरसागर ,अंबादास राशिनकर, श्रावण जाधव, जीवन बोबडे, विकास दिवटे, रवींद्र ढवळे, निलेश तेलंग, अशपाक मुलानी, गणेश देशमुख, तात्या कदम या नावाचा समावेश आहे.
या सर्वांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.