औरंगजेबाचे स्टेटस ठेवून त्याचे उदात्तीकरण केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागले होते. संभाजी नगर, अहिल्यानगर आणि आता कोल्हापूरमध्ये अशी घटना घडलेल्याने राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. अशातच खासदार रामदास आठवले यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.